तुर्भे एम्आयडीसी येथील गोदामामधून ७० लक्ष रुपयांचा मद्यसाठा कह्यात

नवी मुंबई – तुर्भे एम्आयडीसी येथील गोदामामधून पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने ७० लक्ष रुपयांचा मद्यसाठा कह्यात घेतला आहे. (गुन्हे शाखेला कारवाई करावी लागणे ही स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांची अकार्यक्षमता आहे कि त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे ?, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ? या स्थितीत सुधारणा होण्यासाठी आयुक्तांनी कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)

पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ६ सहस्रांहून अधिक मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. याविषयी पोलिसांनी संबंधितांकडे चौकशी केली असता, कस्टमच्या लिलावात मद्य खरेदी केल्याचे सांगण्यात आले; मात्र त्याची कागदपत्रे ते सादर करू शकले नाहीत. त्यामुळे तिघांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये वाटण्यासाठी हा मद्यसाठा करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF