(म्हणे) ‘सत्तेत आल्यास देशातील २० टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ सहस्र रुपये देणार !’ – राहुल गांधी यांचे आमीष

  • देशातील ७१ वर्षांतील सर्वाधिक काळ सत्तेवर असतांना गरिबी हटवण्याऐवजी गरिबांनाच हटवण्याचे पाप करणार्‍या काँग्रेसला अशी योजना राबवण्याचा अधिकार आहे का ?
  • अशा आर्थिक साहाय्याने गरिबी दूर होणार आहे का ? राहुल गांधी यांचे कोणतेही उत्पन्न नसतांना त्यांच्या संपत्तीत कोट्यवधी रुपयांची वाढ कशी होते, त्यांच्या खात्यात कोण पैसे ठेवतात, या आरोपाचे उत्तर ते कधी देणार आहेत ?
  • निवडणूक जिंकण्यासाठी अशी आश्‍वासने देणे म्हणजे एकप्रकारे जनतेला लाच देण्याचा प्रकार होय. अशांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

नवी देहली – काँग्रेसची सत्ता आल्यास  देशातील २० टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ सहस्र रुपये देण्यात येतील. ज्यांचे मासिक उत्पन्न १२ सहस्रांपेक्षा अल्प  आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. या योजनेचे नाव ‘न्याय’ असे ठेवण्यात आले असून यावर वर्षाला ३ लाख ६० सहस्र कोटी रुपये खर्च होतील. राहुल गांधी पुढे म्हणाले की, या योजनेचा लाभ देशातील ५ कोटी कुटुंब आणि २५ कोटी लोकांना होणार आहे. प्रत्येक कुटुंबाचे किमान उत्पन्न १२ सहस्र रुपये करण्याची योजना आहेे.


Multi Language |Offline reading | PDF