मेरठ (उत्तरप्रदेश) येथील रुग्णालयातील अतीदक्षता विभागात महिला रुग्णावर कर्मचार्‍यांकडून सामूहिक बलात्कार

  • अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत !
  • भारतियांची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच यातून स्पष्ट होते ! याला गेल्या ७१ वर्षांत जनतेला नैतिकता आणि साधना न शिकवणारे, त्यांच्यावर योग्य संस्कार न करणारे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील एका रुग्णालयात अतीदक्षता विभागामध्ये उपचार घेत असलेल्या एका महिला रुग्णावर रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४ पुरुष आणि १ महिला यांना कह्यात घेतले आहे. ही महिला श्‍वसनाचा त्रास होत असल्याने भरती झाली होती. तिला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले होते. यानंतर तिघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, अशी तक्रार महिलेच्या पतीने केली आहे. ‘जेव्हा बलात्कार झाला, तेव्हा या विभागातील सीसीटीव्ही छायाचित्रक बंद होते’, असे पोलिसांनी सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now