महाराष्ट्रासह लोकसभेवरही भगवा फडकवल्याविना रहाणार नाही ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – आता राजकीय धुळवड चालू होईल. यामध्ये अनेक रंग उधळले जातील; मात्र आपला रंग भगवा आहे. या भगव्या रंगाने केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशाला व्यापून टाकायला हवे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला आहे. मला खात्री आहे की, असंख्य शिवभक्त निष्ठेला जागतील. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. आम्ही महाराष्ट्रासह लोकसभेवरही भगवा फडकवल्याविना रहाणार नाही, असा विश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मागील देखावा कायमस्वरूपी करण्यात येणार असल्याचे श्री. उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now