(म्हणे) ‘पाकच्या विरोधात बोलणार्‍यांना १० पट अधिक शिव्या घालीन !’ –  नॅशनल कॉन्फरन्सचे नेते महंमद अकबर लोन यांचे देशद्रोही विधान

  • अशी देशद्रोही विधाने करणार्‍या लोन यांना आजन्म कारागृहात डांबून त्यांच्या पक्षांवर बंदी घातली पाहिजे; मात्र असे धाडस कणाहीन भाजप सरकार कधीही करणार नाही, हेही तितकेच खरे !
  • लोन यांचा विरोध देशातील किती मुसलमान संघटना आणि नेते विरोध करतील, हा एक संशोधनाचाच विषय ठरील !
महंमद अकबर लोन

कुपवाडा (जम्मू-काश्मीर) – काश्मीरच्या दुसर्‍या बाजूला इस्लामिक देश (पाकिस्तान) आहे, त्याची भरभराट व्हावी आणि यशही मिळावे. त्याच्यासमवेतची  आपली मैत्री अधिक घट्ट व्हावी. भारत आणि पाकिस्तान यांची एकमेकांसमवेत मैत्री व्हावी. या मैत्रीवरून कोणी त्याला (पाकिस्तानला) वाईट बोलले, तर मी त्यांना १० पट अधिक शिव्या घालीन, असे देशद्रोही विधान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि येथील पक्षाचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार महंमद अकबर लोन येथे एका सभेत केले. (भारताच्या विरोधात कोणी काही बोलले, तर या राष्ट्रघातकी नेत्यांना काही वाटत नाही; मात्र पाकच्या विरोधात बोलल्यावर यांना संताप येतो, हे लक्षात घ्या ! – संपादक) या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची आघाडी झाली आहे. (काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात ‘पाकप्रेम’ हे साम्य असल्यानेच ते अशी आघाडी करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

अकबर लोन हे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. लोन यांनी यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या आहेत. (असे केवळ भारतात घडू शकते. असे अन्य देशात घडले असते, तर एव्हाना लोन यांना फाशी दिली गेली असती ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF