आमदार भरतशेठ गोगावले, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि नागेश गाडे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार !

श्रीक्षेत्र पैठण येथे २६ मार्चला ‘भव्य वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा’ यांचे आयोजन

मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – श्रीक्षेत्र पैठण येथील संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज जन्मसंस्थान (आपेगांव) फड, श्री गाढेश्‍वर मंदिराजवळील माऊली स्थानिक भूमीत २६ मार्चला दुपारी ३ वाजता संत श्री एकनाथ षष्ठी सोहळ्याच्या निमित्ताने ‘भव्य वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा’ आयोजित करण्यात आली आहे. अधिवेशनात धर्मांतर बंदी कायद्यासाठी विधानसभेत आवाज उठवणारे शिवसेनेचे रायगड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले, तसेच हिंदूंसाठी न्यायालयीन लढा देणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदूंच्या देवता आणि संत यांना महत्त्वाचे स्थान देऊन धर्मद्रोह्यांच्या पाखंडाचे खंडण करणारे अन् धर्मप्रसारात सहकार्य करणार्‍या ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक श्री. नागेश गाडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय वारकरी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष धर्माचार्य गुरुवर्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांच्या हस्ते सत्कार होईल. तरी या सोहळ्याला समस्त वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, धर्मप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वारकर्‍यांच्या समस्यांना वाचा फोडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्यवाह ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी २३ मार्चला दिलेल्या एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली जन्मस्थान, श्रीक्षेत्र आपेगांव संस्थान, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांनी या अधिवेशनाचे आयोजन केले आहे. यात अन्य संत आणि मान्यवर यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर हेही मार्गदर्शन करणार आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now