पाकमध्ये २ हिंदु मुलींचे अपहरण करून धर्मांतर केल्याचे आणि विवाह लावल्याचे प्रकरण : (म्हणे) ‘हे आमचे अंतर्गत प्रकरण !’

  • परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अहवाल मागितल्यावर पाकचा कांगावा

  • पाकमध्ये २ हिंदु मुलींचे अपहरण करून धर्मांतर केल्याचे आणि विवाह लावल्याचे प्रकरण

गेल्या ५ वर्षांत पाक आणि बांगलादेश येथे हिंदूंवर अनेक आक्रमणे झाली अन् तेथील हिंदु मुलींचे अपहरण करून, धर्मांतर करून त्यांचे विवाह मुसलमानांशी लावून देण्यात आल्याच्याही अनेक घटना घडल्या; मात्र या ५ वर्षांत भाजप सरकारने मौनच बाळगले आणि आता निवडणुकीच्या कालावधीत अशा प्रकारचा आदेश देऊन ‘आम्ही हिंदूंसाठी काहीतरी करत आहोत’, असेच दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, हे लक्षात घ्या !

Two Hindu teenage girls of 12 and 14 were allegedly kidnapped, forcibly married off and converted to Islam on the eve of Holi in Pakistan.
The incident is a major jolt to Imran Khan’s vision of a ‘Naya Pakistan’.

इस्लामाबाद – पाकच्या सिंधमधील घोटकी गावात होळीच्या दिवशी रविना आणि रिना या दोन अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आले अन् नंतर त्यांचा मुसलमान तरुणांशी विवाह लावून देण्यात आल्याची घटना घडल्याचे समोर आली होती. या घटनेची नोंद घेत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकमधील भारतीय उच्चायुक्तांना यासंबंधी अहवाल देण्यास सांगितले आहे. यानंतर पाकचे सूचनामंत्री फवाद खान यांनी ट्वीट करून म्हटले, ‘हे पाकचे अंतर्गत प्रकरण आहे.’

(काश्मीरविषयी पाकला तोंड उघडतांना तो भारताचा अंतर्गत प्रश्‍न वाटत नाही का ? ‘भारतातील अल्पसंख्यांकांवर अत्याचार होतात’, असे म्हणतांना इम्रान खान यांना हे आठवत नाही का ? – संपादक) त्यावर सुषमा स्वराज यांनी ट्वीट केले, ‘मी केवळ अहवाल मागितला आहे आणि त्यातच तुम्ही घाबरणे हा तुमचा अपराधीपणा दर्शवतो.’ (अशा अपराध्यांना भारत शिक्षा करून हिंदूंचे रक्षण कधी करणार ? – संपादक)

या अपहरणाचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पाकमध्ये हिंदूंनी आंदोलन केले आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही या घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now