जहानाबाद (बिहार) येथे होळी खेळणार्‍या हिंदूंवर धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत १ जण ठार, तर ५ जण घायाळ

  • भारतात धर्मांधांमुळे असहिष्णुता वाढली आहे; मात्र अशा घटनांनंतर तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, लेखक, अभिनेते तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
  • ईद किंवा नाताळ साजरा करणार्‍यांवर कोणी दगडफेक केली असती, तर ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातमी झाली असती; मात्र येथे हिंदूंवर आक्रमण झाल्याने त्याला प्रसारमाध्यमांच्या लेखी मूल्य शून्य आहे !

जहानाबाद (बिहार) – येथील कुकरीखेडा गावामध्ये होळीच्या दिवशी धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ४५ वर्षीय जयप्रकाश ठार झाले. तर अन्य ५ जण घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी साबिर आणि शाकीर यांना अटक केली आहे.

होळीच्या दिवशी सकाळी काही तरुण ढोल वाजवत मुसलमानांच्या वस्तीमध्ये गेले होते. तेव्हा त्यांना तेथे विरोध करण्यात आला. या वेळी झालेल्या वादातून हिंदूंवर दगडफेक करण्यात आली. यात जयप्रकाश, सुभाष, राजऋषि, पिंटू आणि छेदालाल हे घायाळ झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी लाठीमार करून स्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीत घायाळ झालेल्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र दुसर्‍या दिवशी जयप्रकाश यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे येथे तणावाची स्थिती आहे.


Multi Language |Offline reading | PDF