पाकच्या सिंध प्रांतामध्ये होळीच्या दिवशी २ हिंदु तरुणींचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह

पाकमधील हिंदूंविषयी भारतातील एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

  • ‘अल्पसंख्याकांना कशी वागणूक द्यायची हे आम्ही भारत सरकारला दाखवून देऊ’, अशी भाषणबाजी करणारे पाकचे पतंप्रधान इम्रान खान यांना हेच दाखवून द्यायचे होते का ?
  • भारतात एखाद्या हिंदूकडून मुसलमानांच्या संदर्भात अशी घटना कधीतरी घडली आहे का ? हे ‘भारतात असहिष्णुता वाढली’ असल्याचे म्हणणारे सांगतील का ?

इस्लामाबाद – होळीच्या दिवशी पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात २ अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केल्यानंतर त्यांचे मुसलमानांशी विवाह करून देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यातील एकीचे नाव रवीना असून ती १३ वर्षांची आहे, तर दुसरीचे नाव रिना असून ती १५ वर्षांची आहे. या घटनेनंतर येथील हिंदूंनी तीव्र संताप व्यक्त करत ठिकठिकाणी सरकार आणि प्रशासन यांच्याविरोधात निदर्शने केली. काही काळापूर्वी याच प्रांतात कोमल आणि सोनिया या दोघा हिंदु मुलींचे अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांचे धर्मांतर करून मुसलमानांशी विवाह करून देण्यात आला होता.

‘पाकिस्तान हिंदू वेल्फेअर ट्रस्ट’चे प्रमुख संजेश धंजा यांनी सांगितले की, यासंदर्भात पोलिसांत एफ्आयआर् नोंदवण्यात आला आहे. तरीही पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. आता पाकमधील हिंदू समुदाय त्यांच्या हक्कासाठी रस्त्यांवर उतरला आहे. (भारतातील पोलीस हिंदूंच्या विरोधात असतात, तसेच पाकमधीलही असतात, त्यामुळे दोन्ही देशांतील पोलीस हिंदूंसाठी सारखेच, असेच म्हणावे लागेल ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now