बेकायदा होर्डिंगवर कारवाई करणार्‍या कर्मचार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला दंड

बेकायदेशीर कामे करणारे लोकप्रतिनिधी देणारी निरर्थक लोकशाही आता पुरे !

मुंबई – महापालिकेच्या अनुमतीविना लावलेल्या होर्डिंगवर कारवाई केल्याप्रकरणी कर्मचार्‍यांना मारहाण करणारे भाजपचे अंधेरीमधील नगरसेवक मुरजी पटेल यांना उच्च न्यायालयाने २४ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

१. ‘बेकायदा होर्डिंग उभारणे म्हणजे बेकायदा बांधकाम करणे, असे मानले गेले आणि त्याआधारे पालिकेकडून एखाद्या नगरसेवकाला अपात्र ठरवले गेले, तर त्यातून राज्यभरात चांगलाच संदेश जाईल’, असे मत उच्च न्यायालयाने सुनावणीच्या वेळी व्यक्त केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर पालिकेच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारचा कठोर आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

२. जानेवारी २०१८ मध्ये पटेल यांच्या ‘जीवनज्योती फाऊंडेशन’च्या बेकायदा होर्डिंगवर तसेच बॅनरवर कारवाई केली जात असतांना पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कर्मचार्‍यांना मारहाण केली होती.

३. पटेल यांनी नगरसेवक या नात्याने प्रत्येक आठवड्यातील एक दिवस स्वत:च्या वॉर्डमधील शाळा, रुग्णालये, मैदाने इत्यादी ठिकाणी फिरून बेकायदा होर्डिंग आणि बॅनर आहेत का ?, याची पहाणी करावी, असाही आदेश न्यायालयाने पटेल यांना दिला आहे.


Multi Language |Offline reading | PDF