मुंबई येथे हिंदुद्वेष्टा झाकीर नाईक याच्या साथीदाराला अटक !

झाकीर नाईक याला ५० कोटी रुपयांचा निधी अवैध मार्गाने मिळवून दिल्याचे प्रकरण

मुंबई – इस्लामी प्रचारक आणि हिंदु धर्म अन् देवता यांच्याविषयी अपप्रचार करणारा हिंदुद्वेषी झाकीर नाईक याचा साथीदार अब्दुल कादीर नजमुद्दीन साथक याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएम्एल्ए) येथे अटक केली. त्याला मुंबई पीएम्एल्ए न्यायालयापुढे उपस्थित करण्यात येणार आहे. या प्रकरणी नवीन पुराव्यांच्या आधारे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात येईल. त्याचा सराफी व्यवसाय असून तो नाईक याच्या ‘पीस टीव्ही’ वाहिनीची मालकी असलेल्या ‘मे. ग्लोबल ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ या आस्थापनाचा संचालक आहे. त्याने नाईक याला ५० कोटी रुपयांचा निधी अवैध मार्गाने मिळवून दिला होता. त्याचा संयुक्त अरब अमिरातीतील अज्ञात आणि संशयास्पद खात्यातून पैसे नावे करण्यात हात होता. नाईक याची वर्ष २०१६ पासून चौकशी चालू आहे. त्याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर नोव्हेंबर २०१६ मध्ये ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा संस्थांनी त्याच्यावर लक्ष ठेवले असून ढाका येथे १ जुलै २०१६ मध्ये झालेल्या आक्रमणात सहभागी आतंकवाद्यांना नाईक याने प्रोत्साहित केले होते. भारताला आतंकवादी कारवाया आणि द्वेषमूलक भाषणांच्या प्रकरणात नाईक हवा असून तो वर्ष २०१६ मध्ये देश सोडून गेला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now