‘आरोग्य साहाय्य समिती’चे पत्रक आणि फलक उपलब्ध असून त्यांचा प्रसारासाठी अधिकाधिक परिणामकारक उपयोग करा !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !

जून २०१८ मध्ये सप्तम् ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त गरजूंना वैद्यकीय साहाय्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन यांसाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’ची स्थापना करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि हिंदु राष्ट्र-स्थापना यांच्या कार्यात सहभागी होण्याची, तसेच साधना करून ईश्‍वरप्राप्ती करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

या समितीमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाधिक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी व्यक्तींनी सहभागी व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ए ४’ आकारातील रंगीत पाठपोट पत्रक आणि ३ फूट × ४.५ फूट आकारातील फ्लेक्स फलकही उपलब्ध करण्यात आले आहे.

१. पत्रकामध्ये काय आहे ?

अ. आरोग्य साहाय्य समितीचे प्रेरणास्थान आणि स्थापना

आ. आरोग्य साहाय्य समितीच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश

इ. हिंदु जनजागृती समितीचे आपत्कालीन समाजसाहाय्य !

ई. वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी प्रयत्न करा !

१. वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींची काही उदाहरणे

२. डॉक्टर आणि रुग्णालये यांनी फसवल्यास काय करावे ?

उ. आरोग्य साहाय्य समितीच्या कार्यात पुढील प्रकारेही सहभागी व्हा !

२. पत्रक कसे वापरावे ?

हे पत्रक सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच व्यक्तींना न देता, ज्या व्यक्ती जिज्ञासू आहेत, अशांना देण्यासाठी करावा. या पत्रकाचा पुढील प्रकारे उपयोग करावा.

अ. हे पत्रक डॉक्टर, परिचारक, वैद्यकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना वैयक्तिक संपर्क करतांना वापरता येईल.

आ. वैद्यकीय परिषदा, बैठका आदींमध्येही याचा उपयोग करता येईल.

इ. वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांच्या उदा. ‘मेडिकल असोसिएशन’च्या प्रमुखांच्या भेटीच्या वेळी किंवा या संघटनांच्या मासिक बैठकांमध्येही या पत्रकाच्या आधारे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य अवगत करण्यासाठी प्रयत्न करावेत.

३. ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या फलकाचा वापर कुठे करावा ?

आरोग्य साहाय्य समितीचेे फलक वैद्यकीय परिषदा, वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांची कार्यालये, तसेच मंदिरे, वाचनालये, सभागृहे आदी सुयोग्य ठिकाणी संबंधितांची लेखी अनुमती घेऊन लावावेत.

या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी करून घ्या आणि समष्टी साधनेची अमूल्य संधी साधा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF