गुरुग्राम (हरियाणा) येथे क्रिकेट खेळण्यावरून जमावाची मुसलमान कुटुंबातील १२ जणांना मारहाण

प्रसारमाध्यमांकडून दिवसभर वृत्त प्रसारित

प्रतिदिन हिंदूंना धर्मांधांकडून कुठेना कुठे तरी मारहाण होतच असते, हिंदूंच्या मंदिरांवर आघात होतच असतात ! एवढेच काय यापूर्वी काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना मशिदींतून धमकी देऊन पळवून लावण्यात आले, तसेच लव्ह जिहादच्या घटना नेहमीच घडत असतात, त्याविषयी प्रसारमाध्यमे तोंड उघडत नाहीत; मात्र अल्पसंख्यांकांच्या एखाद्या व्यक्तीवर कोणी हात टाकण्याचा प्रयत्न केला, तरी ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्त बनते, हे लक्षात घ्या !

गुरुग्राम (हरियाणा) – येथील भोंडसी परिसरात होळीच्या दिवशी क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून गावांतील २० ते २५ जणांनी घरात घुसून महंमद दिलशाद आणि त्याचे कुटुंबीय यांना मारहाण केली. या वेळी त्यांनी ‘देशात रहायचे नसेल, तर पाकिस्तानात जा’, असे म्हटल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात केला आहे. या घटनेच्या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF