वर्ष २०११-१२ नंतर शेतमजुरांची संख्या ४० टक्क्यांनी अल्प झाली ! – राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा अहवाल

भारत हा शेतीप्रधान देश असतांना शेतमजुरांची संख्या न्यून होण्याचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर होणार, हे लक्षात घेऊन या कालावधीत असणारे काँग्रेस आणि भाजप यांचे सरकार काय करत होते ?

नवी देहली – वर्ष २०११-१२ नंतर शेतात काम करणार्‍या शेतमजुरांची संख्या ४० टक्क्यांनी अल्प झाली आहे, अशी माहिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने जारी केलेल्या ‘पिरिओडिक लेबर फोर्स सर्व्हे’ (पीएल्एफ्एस्) २०१७-१८ मध्ये देण्यात आली आहे. शेतात काम करणारे सुमारे ३ कोटी २ लाख ग्रामीण शेतमजूर बेरोजगार झाले आहेत. यात गरीब शेतकर्‍यांचाही समावेश आहे, असे या अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे शेतीव्यतिरिक्त इतर क्षेत्रांत मजुरी करणारे ७.३ टक्के पुरुष, तर ३.३ टक्के महिलांची संख्या घटली आहे. या अहवालात स्वतः शेती करणार्‍यांच्या संख्येत ४ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF