‘डी.डी. देसाई असोसिएट्स’ संस्थेकडून पडताळणी केलेल्या पुलांची फेरपडताळणी होणार

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पूल दुर्घटनेनंतर डी.डी. देसाई असोसिएट्स संस्थेने पडताळणी केलेल्या ७३ पुलांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे.

पालिकेने मुंबईतील २९६ पुलांच्या संरचनात्मक पडताळणीसाठी तांत्रिक सल्लागार नेमले होते. त्यात देसाई यांच्या संस्थेने हिमालय पूल उत्तम स्थितीत असल्याचे म्हटले होते; तरीही या पुलाचा भाग कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्‍चिम आणि पूर्व उपनगरांतील पुलांची पडताळणी त्याच संबंधित सल्लागारांकडून करण्यात येणार आहे. केवळ आपल्याच अहवालाचा आढावा घ्यायचा आहे. त्यामुळे त्यात फारसे पालट येणार नसल्याची शक्यता आहे. शहर भागातील पुलांच्या पडताळणीसाठी नवीन तांत्रिक सल्लागार नेमण्यात येणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF