२ मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे न्यूझीलंडमध्ये ‘सेमी अॅटोमॅटिक रायफल’च्या विक्रीवर बंदी

वेलिंग्टन (न्यूझीलंड) – न्यूझीलंडमध्ये खाईस्टचर्च येथील २ मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर देशभरात शस्त्रांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. यामुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी ‘सेमी अॅटोमॅटिक रायफल’च्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. कोणतेही शस्त्र जीवघेणे आणि घातक ठरू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अर्डर्न यांनी स्पष्ट केले. गोळीबार करणार्‍या टॅरॅन्ट याने त्याच्याकडील शस्त्र कायदेशीर पद्धतीने विकत घेतले होते.


Multi Language |Offline reading | PDF