शिवस्मारकाच्या कामात अनियमितता असल्याने महालेखापालांनी विशेष पडताळणी करण्याची आवश्यकता

माहिती अधिकारात उघड झालेली माहिती !

अनियमितता असल्याचे अनेकांनी सांगूनही यासंदर्भात इतके दिवस उपाययोजना न काढणार्‍या संबंधितांना कठोर शासनच हवे !

मुंबई – अरबी समुद्रामधील शिवस्मारकाच्या कामात काही गंभीर अनियमितता आहेत. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या कामाची महालेखापालांनी विशेष पडताळणी (ऑडिट) करण्याची आवश्यकता आहे, असे पत्र २६ फेब्रुवारी या दिवशी सार्वजनिक बांधकामाचे विभागीय लेखाधिकारी विकास कुमार यांनी राज्याच्या महालेखापालांना पाठवले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीवरून ही गोष्ट उघड झाली.

जुलै २०१८ मध्ये वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी, स्मारक विभाग यांनीही या प्रकल्पात अनियमितता असल्याचे म्हटले होते. प्रकल्पाची किंमत २ सहस्र ५०० कोटींवरुन ३ सहस्र ८०० कोटी रुपयांवर नेण्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता. निविदा प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी म्हटले होते. सप्टेंबर २०१८ मध्ये शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ‘शिवस्मारकाच्या कामात अनियमितता असून त्याची चौकशी करा’, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.


Multi Language |Offline reading | PDF