(म्हणे) ‘भारताने पाकमध्ये खरेच एअर स्ट्राइक केला आहे का ?’ – काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांचा प्रश्‍न

  • कुठल्याही राष्ट्रप्रेमी भारतीय नागरिकाच्या मनात हा प्रश्‍न आला नाही; कारण त्याला भारतीय सैन्याच्या शौर्यावर विश्‍वास आहे. काँग्रेसवाल्यांना असे प्रश्‍न पडतात; कारण त्यांची राष्ट्रघातकी मानसिकता ! अशा मानसिकतेच्या नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेसवाल्यांच्या हाती सत्ता देणे, म्हणजे देशाला विनाशाच्या खाईत लोटण्यासारखे आहे !
  • सैन्याच्या कारवाईवर अविश्‍वास दाखवणार्‍या अशा राष्ट्रघातक्यांना कारागृहात डांबून कठोर शिक्षा करण्याची तरतूद असणारा कायदा सरकारने कार्यान्वित करावा !

नवी देहली – भारताने बालाकोट येथे केलेल्या कारवाईविषयी मी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि अन्य वर्तमानपत्रे यांमध्ये वाचले. त्यानुसार भारताने खरेच अशी कारवाई केली आहे का ? आपण खरेच ३०० आतंकवादी मारले ? जर तुम्ही म्हणता की, ३०० आतंकवादी मारले, तर सर्व भारतियांना याचा पुरावा मिळायला हवा; कारण ‘या कारवाईमध्ये कोणीही ठार झालेले नाही’, असे आंतरराष्ट्रीय माध्यमे म्हणत आहेत. त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून मला याचे वाईट वाटते, असे मत काँग्रेसचे परदेशातील (ओव्हरसिज काँग्रेस) अध्यक्ष आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे. (विदेशी विशेषतः अमेरिकेतील प्रसारमाध्यमे ही भारतद्वेष्टी आहेत, हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे. असे असतांना असे ‘एअर स्ट्राईक’ केल्याची माहिती भारत सरकार आणि सैन्यप्रमुख देत असतांना त्यावर विश्‍वास न ठेवणारे नेते भारताचे कि अमेरिकेचे ? – संपादक) भारतावर अशा प्रकारची आतंकवादी आक्रमणे यापूर्वीही झाली आहेत. मुंबईतही असेच आक्रमण झाले होते, तेव्हादेखील आपण विमाने पाठवू शकलो असतो; पण मला ही भूमिका पटत नाही, असेही पित्रोदा यांनी सांगितले. (‘एका गालावर थप्पड मारल्यास दुसरा गाल पुढे करा’, ही गांधीगिरी झाली. अशी काँग्रेसी भूमिका घेतल्यामुळे भारताची अपरिमित हानी झाली. त्यामुळे अशी मानसिकता बाळगणार्‍या काँग्रेसवाल्यांना आता भारतीय योग्य धडा शिकवतील ! – संपादक)

सॅम पित्रोदा

सॅम पित्रोदा पुढे म्हणाले की, भाजपचे लोक सांगतात की, पंतप्रधान मोदी हे सशक्त सरकारचे प्रतीक आहेत; मात्र भारताने आता ठरवायला हवे की, लोकशाहीच्या भल्यासाठी सशक्त सरकार असणे आवश्यक नाही. हिटलरही खूपच सशक्त होता. जगातील सर्व हुकूमशहा सशक्त होते. चीनचे पंतप्रधानही सशक्त आहेत. हेच भारतालाही हवे आहे का? (भाजपच्या सरकारने अशी कोणती हुकूमशाही राबवली आहे, हे पित्रोदा यांनी सांगायला हवे ! उलट काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून हुकूमशाही आणली होती, हे भारतीय जनता विसरलेली नाही ! – संपादक)

(म्हणे) ‘संपूर्ण पाकला दोषी ठरवता येणार नाही !’ – सॅम पित्रोदा

  • भारताने आणि सैन्याने या कारवाईविषयी आधीच स्पष्ट केले आहे की, ही कारवाई केवळ आतंकवादी तळावर केलेली आहे. नागरिकांच्या विरोधात नाही, तरीही पित्रोदा असे देशद्राही विधान करत आहेत, हे लक्षात घ्या !
  • हिंदु धर्मानुसार दोषी आणि दोषींना पाठीशी घालणारे दोघेही गुन्हेगार असतात. ‘इंद्राय स्वाहा । तक्षकाय स्वाहा ।’, असे म्हटलेे आहे. पाकिस्तानमधील आतंकवाद्यांना पाकचे सरकार पोसत आहे आणि जनतेचा त्याला पाठिंबा आहे. त्यामुळे भारतावरील प्रत्येक आक्रमणासाठी संपूर्ण पाकला दोषी ठरवायला हवे. जर पित्रोदा यांना तसे वाटत नसेल, तर काँग्रेसने जे दोषी वाटत होते, त्यांच्यावर तरी त्यांच्या सत्ताकाळात का कारवाई केली नाही, याचे उत्तर दिले पाहिजे. म्हणजे ‘आम्ही काहीच करणार नाही आणि तुम्हीही काही करू नका’ अशाच राष्ट्रघातकी मनोवृत्तीची काँग्रेस आहे, हे पुन्हा उघड होते !

मुंबईवरील आक्रमणाच्या वेळी ८ लोक येथे आले होते आणि त्यांनी आक्रमण केले. त्यासाठी तुम्ही पाकिस्तानातील सर्व नागरिकांना दोषी ठरवू शकत नाही; पण हीच गोष्ट आपण स्वीकारत नाही. भारताने पाकवर केलेल्या कारवाईची पद्धतही चुकीची होती, असेही पित्रोदा म्हणाले. (योग्य पद्धत काय हवी हे काँग्रेसने त्याच्या सत्ताकाळात दाखवून आतंकवाद नष्ट का करून दाखवला नाही ? – संपादक)

(म्हणे) ‘माझे विधान ही पक्षाची भूमिका नाही !’ – सॅम पित्रोदा यांची सारवासारव

सॅम पित्रोदा ‘ओव्हरसिज काँग्रेस’चे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचे विधान हे पक्षाचीच भूमिका असणार, हे उघड आहे. एखादे वक्तव्य अंगलट आल्यावर अशी सारवासारव करणार्‍या काँग्रेसवाल्यांना जनता ओळखून आहे !

सॅम पित्रोदा यांच्यावर टीका झाली नसती आणि त्याचा तोटा काँग्रेस पक्षाला झाला नसता, तर पित्रोदा यांनी अशी सारवासारव केली असती का ? सॅम पित्रोदा यांच्यावर भाजपने टीका केल्यावर त्यांनी सारवासारव करणारे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, ‘‘मी पक्षाकडून बोलत नसून मी देशाचा नागरिक म्हणून हे विधान केले आहे. माझे विधान ही पक्षाची भूमिका नाही. देशात काय चालले आहे, हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे. (पित्रोदा यांच्या प्रश्‍नावरून ते जाणून घ्यायच्या भूमिकेत नव्हे, तर जाब विचारण्याच्या भूमिकेत होते, हे लक्षात येते ! – संपादक) मी जर प्रश्‍न विचारला तर मी चुकलो कुठे ?’’ (पित्रोदा यांनी प्रश्‍न विचारला नाही, तर या कारवाईचाच विरोध केला आहे. काँग्रेसने आतंकवादाच्या विरोधात कृती केलेली नाही आणि अन्य कोणीही ती करू नये, असेच त्यांना म्हणायचे आहे आणि हा राष्ट्रघातच आहे ! – संपादक)

सॅम पित्रोदा यांनी ‘पाकिस्तान राष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यास प्रारंभ केला आहे ! – पंतप्रधान मोदी

नवी देहली – सर्वांत विश्‍वासू सल्लागार आणि काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शकांनी भारतीय सुरक्षादलांचा अपमान करत काँग्रेसच्या वतीने ‘पाकिस्तान राष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यास प्रारंभ केला आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सॅम पित्रोदा यांच्यावर केली आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेसला कधीच आतंकवादाला उत्तर द्यायचे नव्हते. हे देशाला आधीपासून ठाऊक होते. काँग्रेसच्या घराणेशाहीच्या निष्ठावंत दलालांनी ते पुन्हा एकदा सांगितले आहे. हा नवा भारत आहे. आतंकवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. विरोधक वारंवार आपल्या सुरक्षादलांचा अपमान करत आहेत. मी माझ्या सहकारी भारतियांना आवाहन करतो की, त्यांनी विरोधी नेत्यांना त्यांच्या वक्तव्याचा जाब विचारावा. भारतीय आपल्या सुरक्षादलांसोबत ठाम उभे आहेत.

(म्हणे) ‘आम्ही ‘बॅकफूट’वर राहून आतंकवादाशी लढा देत नाही !’ – जेटली

आतंकवादाचा पूर्ण निःपात करण्यासाठी ज्या दिवशी भाजप सरकार कंबर कसेल, त्या दिवशी तो खर्‍या अर्थाने ‘फ्रंटफूट’वर असेल, हेही जेटली यांनी लक्षात घ्यावे !

नवी देहली –  ज्यांना देशाची समज नाही तेच लोक अशी वक्तव्य करतात. कोणताही सामना ‘बॅकफूट’वर (मवाळ राहून) खेळ जिंकला जाऊ शकत नाही. देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही ‘फ्रंटफूट’वर (आक्रमक राहून) आहोत. जर गुरु असा असेल, तर शिष्य किती निष्क्रीय असेल, असे प्रत्युत्तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सॅम पित्रोदा यांच्या विधानावर दिले.

जेटली पुढे म्हणाले की,

१. आम्ही केलेली दोन्ही ‘ऑपरेशन’ यशस्वी झाली आहेत. पूर्वी देशात घुसून आतंकवादी आक्रमण करणार्‍यांवर कारवाई व्हायची; पण आता जिथून आतंकवादाला प्रारंभ होतो, तिथेच कारवाई केली जात आहे.

२. सॅम पित्रोदा आज पाकिस्तानच्या ‘टीआरपी’त पहिल्या क्रमांकावर असतील.

(म्हणे) ‘सॅम पित्रोदा यांचे विधान काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही !’ – काँग्रेस

काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून म्हटले की, सॅम पित्रोदा यांचे विधान ही काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्टपणे सांगितले आहे की, पुलवामा येथील आतंकवादी आक्रमण मोदी सरकारची एक राष्ट्रीय सुरक्षेविषयीची गंभीर चूक होती, तर एअर स्ट्राईक आपले वायूदल शक्तीशाली असल्याचे उदाहरण आहे. मोदी आणि भाजप यांनी एका व्यक्तीच्या व्यक्तीगत विचारांना लक्ष्य करून टीका करणे बंद केले पाहिजे. पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणासाठी स्फोटके कुठून आली, याविषयी मोदी सरकारला काहीच ठाऊक नव्हते. ही गंभीर चूक आहे.


Multi Language |Offline reading | PDF