साधकांनो, ३१.३.२०१९ या दिवसापर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी (वसुली) पूर्ण करा !

जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

‘संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून ३१.३.२०१९ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी. प्रलंबित येणे बाकीचा जिल्हानिहाय आढावा पुढे देत आहे.

१. नियतकालिक सनातन प्रभातच्या विज्ञापनांची येणे बाकी

२. ‘सनातन पंचांगा’च्या विज्ञापनांची प्रलंबित असलेली येणेबाकी

३. गुरुपौर्णिमेच्या स्मरणिका आणि विशेष स्मरणिका यांच्या विज्ञापनांची येणे बाकी

४. अन्य विशेषकांच्या विज्ञापनांची येणे बाकी

अमरावती, जळगाव, कोल्हापूर, संभाजीनगर, रत्नागिरी आणि बेळगाव

५. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या मराठी भाषेतील ग्रंथांच्या विज्ञापनांची प्रलंबित येणे बाकी

जळगाव आणि बेळगाव

६. ग्रंथांच्या विज्ञापनांची प्रलंबित येणे बाकी

ठाणे आणि अमरावती

७. साधकांनो, ‘प्रलंबित येणे बाकी वेळेत पूर्ण केली, तरच आपली सेवा परिपूर्ण होणार आहे’, हे लक्षात घ्या !

‘प्रलंबित राहिलेली सर्व येणे बाकी वेळेत पूर्ण करणे, ही आपली साधना आहे’, हे लक्षात घेऊन उत्तरदायी साधकांनी ३१.३.२०१९ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करण्याचे नियोजन करावे. यापुढेही जिल्हास्तरावर धर्मप्रसाराचे नियोजन करतांना प्रत्येक मासाला प्रथम प्राधान्याने येणे बाकी पूर्ण करण्याचे वेळोवेळी नियोजन करावे.

साधकांनो, विज्ञापने घेण्याची सेवा करतांना खालील महत्त्वाची सूत्रे लक्षात घ्या !

राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याला हातभार लावण्यास इच्छुक असलेल्यांकडून विज्ञापने घेण्याची सेवा ईश्‍वरी कृपेने साधकांना लाभत आहे. विज्ञापने घेतांनाच रक्कम घेतल्यास अथवा काही अडचण असल्यास विज्ञापने छापून आल्यावर त्वरित येणे बाकी पूर्ण केल्यास ही सेवा गुरूंना अपेक्षित अशी होईल.

साधक विज्ञापनदात्यांकडे लगेचच जात नसल्याने त्यांनी तो निधी अन्यत्र वापरल्याचे बर्‍याच वेळा लक्षात येते. त्यामुळे नंतर येणे बाकी पूर्ण करण्यात साधकांना पुष्कळ ऊर्जा व्यय करावी लागते, तसेच संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष दिवसेंदिवस बहरत असल्याने नव्याने जोडलेल्या हितचिंतकांना भेटण्यास वेळ अपुरा पडतो.

साधकांनो, कालगती लक्षात घेऊन फलनिष्पत्तीसहित सेवा करून जलद प्रगती करून घ्या !’


Multi Language |Offline reading | PDF