(म्हणे) ‘भारत आणि पाक यांनी चर्चा करून तोडगा काढावा ! 

चीनच्या नेतृत्वाखालील शांघाय सहकार्य परिषदेचे आवाहन

असे आवाहन ही परिषद चीन आणि अमेरिका यांना का करत नाही ? चीनला मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यास का सांगत नाही ?

शांघाय (चीन) – पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारत आणि पाक यांच्यामध्ये निर्माण झालेल्या मतभेदांवर दोन्ही देशांनी परस्परांशी चर्चा करून मार्ग काढावा. संघटनेमध्ये शत्रूत्वाची भावना पसरणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन चीनच्या नेतृत्वाखालील शांघाय सहकार्य परिषदेने (‘एस्सीओ’ने) केले आहे.

पुलवामा येथील आतंकवादी आक्रमण

१. या परिषदेचे नवनियुक्त सरचिटणीस व्लादिमीर नोरोव्ह यांनी म्हणाले की, आतंकवादाविरोधात लढण्यासाठी भारत आणि पाक यांनी कटीबद्ध असले पाहिजे. अन्यथा एस्सीओमध्ये सहभागी होणे दोन्ही देशांना कठीण होऊन बसेल.

२. बर्‍याच वर्षांच्या चर्चेनंतर वर्ष २०१७ मध्ये भारत आणि पाक यांचा एस्सीओ देशाच्या संघटनेमध्ये समावेश करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF