मेहुल चोक्सी यांना भारतात आणण्याची प्रक्रिया चालू

नवी देहली – पंजाब नॅशनल बँकेची १३ सहस्र कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांना लंडन येथे अटक करण्यात आल्यावर याच प्रकरणातील पळून गेलेले दुसरे आरोपी मेहुल चोक्सी यांना भारतात आणण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. सध्या चोक्सी अँटिग्वा येथे आहेत. त्यांच्या प्रत्यापर्णासाठी अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांनी अँटिग्वा प्रशासनाला कागदपत्रे पाठवली आहेत. चोक्सी यांनी गेल्या वर्षी भारतीय पारपत्र जमा करून अँटिग्वाचे नागरिकत्व स्वीकारले आहे.


Multi Language |Offline reading | PDF