राजौरी येथे पाकच्या गोळीबारात १ सैनिक हुतात्मा

  • ‘भारत आता आतंकवाद सहन करणार नाही’, असे म्हणणारे पंतप्रधान मोदी पाकचा गोळीबार आणि त्यात होणार्‍या भारतीय सैनिकांचे हौतात्म्य गेली ५ वर्षे का सहन करत आहेत ? याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे !
  • काँग्रेसच्या राज्यातही असा गोळीबार होत होता आणि भाजपच्या ५ वर्षांच्या सत्तेतही तो चालूच आहे, हे पहाता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
प्रतीकात्मक चित्र 

श्रीनगर – पाकने काश्मीरच्या राजौरी येथील सीमेवरील भारतीय चौक्यांवर केलेल्या गोळीबारात १ सैनिक हुतात्मा झाला आहे. या गोळीबाराला भारतीय सैनिकांनीही प्रत्युत्तर दिले. काश्मीरमधील सोपोर येथे आतंकवाद्यांनी गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकावर ग्रेनेड फेकले. यामध्ये एका अधिकार्‍यासह २ पोलीस घायाळ झाले. यानंतर संपूर्ण भागाला पोलिसांनी घेरले. त्यानंतर येथे चकमक चालू होती.


Multi Language |Offline reading | PDF