मुलाच्या विवाहाच्या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करणारे रत्नागिरी येथील बेडेकर कुटुंबीय !

‘सनातनचे रत्नागिरी येथील साधक श्री. मोहन केशव बेडेकर यांचे सुपुत्र चि. मंगेश यांचा शुभविवाह पनवेल येथील सनातनचे साधक श्री. किरण जोशी यांची कन्या चि.सौ.कां. उन्मेषा यांच्याशी फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (२२ मार्च २०१९) या दिवशी होत आहे. या विवाहानिमित्त बनवण्यात आलेल्या लग्नपत्रिकेवर बेडेकर कुटुंबियांनी धर्मशिक्षण देणारे लिखाण प्रसिद्ध करून सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे आणि ‘लग्नपत्रिकेच्या माध्यमातून धर्मशिक्षण कसे द्यावे’, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

विवाहपत्रिकेतील एका पानावर प्रसिद्ध केलेले धर्मशिक्षण देणारे लिखाण

१. पत्रिकेच्या पाकिटाच्या मुखपृष्ठावर ‘स्वस्तिक’ या शुभचिन्हाचे मंडल घालण्यात आले आहे, तर मलपृष्ठावर सनातन संस्था करत असलेल्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच अध्यात्मप्रसाराच्या कार्याद्वारे आध्यात्मिक उन्नती सुलभतेने होत असल्याने या कार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. ‘आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रवचन आयोजित करण्यासाठी साहाय्य करणे’, ‘वस्तू, जागा आणि अर्थ रूपाने साहाय्य करणे’, ‘जनजागृती आणि प्रबोधन करणार्‍या मोहिमांमध्ये सहभागी होणे’, तसेच समाजप्रबोधनाचा भाग म्हणून घर, दुकान, कार्यालय यांच्या भिंती, पिशव्या, लग्नपत्रिका, दिनदर्शिका यांवर आध्यात्मिक लिखाण प्रसिद्ध करणे आदींद्वारे या कार्याचा लाभ करून घेण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे.

२. लग्नपत्रिकेवर चारही बाजूंनी ‘श्री गुरवे नमः’ असे मंडल काढलेले आहे. खालील भागात ‘धर्मसूर्यापुढे नतमस्तक होऊनी, चालूया संसाराची वाट । राष्ट्रधर्म कार्याचे व्रत घेऊनी, पाहुया ईश्‍वरी राज्याची पहाट ॥’ अशी राष्ट्र आणि धर्म प्रेम जागृत करणारे काव्यपंक्ती लिहिली आहे. तसेच मागील बाजूस ‘वधू-वराची वेशभूषा कशी असावी ?’ ‘विवाहातील भोजन कसे असावे ?’ यांसह ‘विवाहप्रसंगी अशास्त्रीय आणि अनिष्ट कृती टाळून विवाहविधीचे पावित्र्य जोपासा !’ आदींविषयी प्रबोधनपर लिखाण प्रसिद्ध करण्यात आले आहे.’


Multi Language |Offline reading | PDF