समझौता स्फोटातील आरोपींची निर्दोेष मुक्तता झाल्यावर पाकचा थयथयाट

भारतीय उच्चायुक्तांना बोलावून विरोध

भारतात आतंकवादी कारवाया करणारे मसूद अझहर, हाफीज सईद, दाऊद इब्राहिम, सय्यद सलाऊद्दीन, टायगर मेमन आदी आतंकवाद्यांना पाकने कोणती शिक्षा दिली आहे, हे पाकिस्तान सांगेल का ?

इस्लामाबाद – समझौता स्फोटाच्या प्रकरणी पंचकुला येथील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने स्वामी असीमानंद यांच्यासहित ४ आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यावर पाकिस्तानने थयथयाट केला आहे. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ‘भारताच्या उच्चायुक्तांसमोर हे सूत्र मांडण्यात आले आहे आणि या प्रकरणात सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यावर पाकने आक्षेप घेतला आहे.’ पाकने भारताच्या उच्चायुक्तांना बोलावून वरील सूत्र मांडले. पाकच्या या कृतीनंतर भारताने पाकला उत्तर देतांना म्हटले आहे, ‘भारतीय न्यायप्रणाली पारदर्शक आहे. सर्व पुरावे आणि साक्ष यांना समोर ठेवूनच निर्णय दिला आहे. या प्रकरणात पाकच सहकार्य करत नव्हता. साक्षीदारांना पाठवण्यात आलेले समन्सही पाकने परत पाठवले होते.’ या स्फोटामध्ये पाकचे ४३ नागरिक ठार झाले होते, तर १० जण घायाळ झाले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now