पुरो(अधो)गाम्यांना होई देवाची आठवण !

कोयनानगर (जिल्हा सातारा) येथील धरणग्रस्त विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसून जवळपास एक मास उलटला. या उपोषणाची नोंद प्रशासनाने त्यांच्या परीने घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ‘आम्ही म्हणतो त्याप्रमाणेच झाले पाहिजे’, हा उपोषणकर्त्यांच्या नेत्याचा हेकेखोरपणा नडला ! सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सरकार आणि प्रशासन यांच्या विरोधात मत कलुषित करण्याचा डाव ज्येष्ठ पुरो(अधो)गामी डॉ. भारत पाटणकर यांनी आखला आहे. ७ जिल्ह्यांतील १३ ठिकाणी सहस्रो धरणग्रस्त उपोषणाला बसले असून डॉ. पाटणकर त्यांना भावनिक आवाहन करण्यात व्यस्त आहेत. ‘जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार’, असे डॉ. पाटणकर सांगत आहेत. स्वत:ला धरणग्रस्तांचे तारणहार समजणार्‍या डॉ. पाटणकर यांनी सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी २१ मार्चपर्यंतची समयमर्यादा दिली होती. ‘तोपर्यंत सरकारने काही हालचाली न केल्यास २२ मार्चला ७ जिल्ह्यांत उपोषणास बसलेले सहस्रो उपोषणकर्ते श्रीक्षेत्र पंढरपूरला प्रयाण करतील आणि ‘सरकारला सद्बुद्धी दे’, असे साकडे श्री विठ्ठलाला घालतील’, असे जाहीर केले होते.

वास्तविक डॉ. पाटणकर हे स्वत:ला बौद्घांचा अनुयायी मानतात. मन:शांतीसाठी त्यांना कराड तालुक्यातील आगाशिवच्या डोंगरातील बौद्ध लेणी महत्त्वाची वाटतात. पंढरीच्या विठुरायावर निस्सिम श्रद्धा असणारा वारकरी संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्रात विखुरला आहे. ‘याचाच अपलाभ उठवण्यासाठी डॉ. पाटणकर पंढरपूरला प्रयाण करण्याचे बोलत आहेत’, असे वाटते. कारण स्वत:ला पुरो(अधो)गामी म्हणवणार्‍या डॉ. पाटणकर यांनी मागे श्रीविठ्ठलाच्या पूजेला विरोध दर्शवला होता. तसेच श्रीविठ्ठलाच्या पूजेतील पुरुषसूक्तावर आक्षेप घेतला होता. आता एवढे करून ते पुन्हा पंढरपूरच्या दिशेने जाण्याचे सांगत आहेत. त्यामुळे ‘डॉ. पाटणकर यांनी जनाची नाही किमान मनाची तरी लाज बाळगावी’, असे एखाद्या वारकर्‍याने म्हटल्यास चूक ते काय ! पंढरपूरसारख्या पवित्र भूमीत सहस्रो धरणग्रस्तांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यास तेथे कलह निर्माण होऊ शकतो. हा तीर्थक्षेत्राचे वातावरण कलुषित करणे, तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, असे वातावरण निर्माण करण्याचा आणि भाविक अन् प्रशासन यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होईल. आता निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने पंढरपूर येथे काही कटूप्रसंग ओढवून प्रशासनाने धरणग्रस्तांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे नोंदवल्यास त्याला उत्तरदायी कोण ? कारण काहीही असो; परंतु या निमित्ताने का होईना, पुरो(अधो)गाम्यांना देवाची आठवण झाली, हेही नसे थोडके !

– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now