होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनावर योग्य ती कृती करा !

  • तहसीलदार यांचे पोलीस निरीक्षकांना आदेश

  • हिंदु जनजागृती समितीचे सुयश !

जत (जिल्हा सांगली), २१ मार्च (वार्ता.) – होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांवर आळा घालणे आणि महिला सुरक्षेसाठी सहकार्य करणे या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जत येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते. याची नोंद घेत तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी पोलीस निरीक्षकांना या संदर्भात योग्य ती कृती करण्यासाठी आदेश पारीत केले आहेत. पोलीस निरीक्षकांना पाठवलेल्या आदेशात म्हटले आहे, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. निला हत्ती, तसेच अन्य यांच्यावतीने देण्यात आलेल्या सूत्रांवर सविस्तर चौकशी करून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याविषयी चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, तसेच सदर कालावधीत होणारे गैरप्रकार होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. या संदर्भात केलेल्या कार्यवाहीविषयी निवेदन देणार्‍यांना कळवण्यात यावे.


Multi Language |Offline reading | PDF