मुंबई येथे धर्मद्रोही अंनिसचा ‘होळी लहान, पोळी दान’ उपक्रम राबवण्याचा खटाटोप !

  • हिंदूंना पोळी दान करण्याचा सल्ला देणारे अंनिसवाले कधी ईदला मुसलमानांना बकरी दान करण्याचा सल्ला देतात का ? यावरून हिंदुद्वेषी अंनिसवाल्यांना केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांचे वावडे आहे, हे लक्षात घ्या !
  • वर्षभर गरिबांसाठी काही न करता सणाच्या वेळी होळीची पोळी दान करण्याचे आवाहन करणे, हा भंपक अंनिसचा दांभिकपणा आहे !
  •  हिंदूंनो, तुम्हाला धर्माचरणापासून दूर नेणार्‍या धर्मद्रोही ढोंगी अंनिसला याविषयी जाब विचारा !

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – अन्य धर्मियांच्या सणांमध्ये हस्तक्षेप करण्याचे धारिष्ट्य नसलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या कार्यकर्त्यांनी २० मार्चच्या रात्री मुंबईमध्ये काही ठिकाणी ‘होळी लहान, पोळी दान’ उपक्रम राबवण्याचा खटाटोप केला. दादर, मीरा रोड, दहिसर आदी भागांत फिरून अंनिसच्या काही कार्यकर्त्यांनी पुरणाची पोळी होळीमध्ये न टाकता, ती दान करण्याचे आवाहन केले. काही कार्यकर्त्यांनी वसाहतींमध्ये जाऊन पोळ्या जमा करण्याचा उद्योग केला. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी गरीबांना या पोळ्यांचे वाटप केले. (गणेशोत्सव आला की ‘मूर्तीदान करा’, महाशिवरात्र आली की, ‘शिवपिंडीवर दूध वाहू नका, ते गरिबांना द्या’, अशा प्रकारे मोहीम राबवणार्‍या अंनिसने ‘दर्गावर चादर चढवण्यापेक्षा ती भिकार्‍यांना द्या’, ‘हजला जाण्याऐवजी त्याचे पैसे गरिबांना द्या’, अशा मोहिमा राबवण्याचे धारिष्ट्य दाखवावे ! अंनिसला पर्यावरणाविषयी खरोखरच कळवळा आहे, तर त्यांनी ‘ईदला मातीचा बकरा कापावा’, ‘ख्रिसमस ट्री’साठी झाडे तोडू नये’, अशा मोहिमा राबवाव्यात ! धर्माचरणातून पर्यावरणात अधिक चैतन्य निर्माण करणार्‍या हिंदूंना उपदेश करू नये ! – संपादक)

पुणे महानगरपालिकेकडून लाकडे न जाळता दिवा लावून प्रतिकात्मक होळी पेटवण्याची सूचना

पुणे – हिंदूंचे कोणतेही सण उत्सव आले की, स्वतःला विवेकवादी म्हणवणार्‍या अंनिससारख्या पुरोगामी संघटना हिंदु समाजाचा बुद्धीभेद करतात. यंदाही ‘एक पोळी होळीची-भुकेलेल्या मुखाची’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. अंनिसप्रमाणेच ‘रॉबिनहूड आर्मी’ ही संघटना पुरणपोळीचे दान स्वीकारणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कार्यालयानेही होळीसाठी लाकडे न जाळता एक दिवा लावून, त्याचप्रमाणे अनेक ठिकाणांपेक्षा एकाच ठिकाणी प्रतिकात्मक होळी पेटवण्याची विनंती केली होती. (हिंदूंना सण-उत्सव साजरे करण्यामागील धर्मशास्त्र माहीत नसल्याने त्यांच्या प्रथा-परंपरांना विरोध करून त्यांची दिशाभूल केली जात आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF