अपूर्ण न्याय !

संपादकीय

जीवनात कालचक्राचे महत्त्व मोठे विलक्षण असते. कोणाच्याही जीवनात कधी एकच स्थिती कायम रहात नाही. मग ती चांगली असो वा वाईट. वाईटानंतर चांगले ठरलेलेच असते. विविध प्रकरणांत गोवण्यात आलेल्या निष्पाप हिंदुत्वनिष्ठांच्या संदर्भात असे काहीसे आशादायी चित्र सध्या पहावयास मिळत आहे. वर्ष २००७ मध्ये झालेल्या समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने स्वामी असीमानंद यांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. मालेगाव प्रकरणानंतर आता समझौता बॉम्बस्फोट प्रकरणातही हिंदूंचे निर्दोषत्व सिद्ध झाले.

काँग्रेसची पापे !

काँग्रेसची हिंदुद्वेषी राजवट हिटलरला लाजवणारी आहे. हिटलरने आयुष्यात एकदाच ज्यूंची हत्या केली; पण काँग्रेस मात्र हिंदूंना संपवण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालत आहे. मालेगाव प्रकरणानंतर सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ‘हिंदु दहशतवाद’, हा शब्द जन्माला घालण्याचे महापाप केले. त्याचीच ‘री’ ओढत तत्कालीन काँग्रेस सरकारचे हिंदुद्वेषी गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणाच जुंपली. मग नसलेले पुरावे गोळा करणे, निष्पापांना अटक करणे, धाडी टाकणे, या गोष्टी ओघाने आल्याच. मालेगाव प्रकरणी लेफ्टनंट कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह अनेक निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना अटक करून अनेक वर्षे कारागृहात डांबून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले गेले. ज्याप्रमाणे जनावरांना माणसाच्या रक्ताची चटक लागते, त्याप्रमाणे पोलीस दलाला हिंदूंवर अत्याचार करण्याची चटक लागली आहे. पोलीस नावाची ही यंत्रणा दुर्जनांचा कर्दनकाळ बनून नव्हे, तर हिंदूंना त्रास देणारी यंत्रणा बनून काम करत आहे. मालेगाव प्रकरणानंतर हिंदूंना अटक करण्याची टूम निघाली. ‘कोणत्याही प्रकरणात हिंदूंचाच हात आहे’, याच दृष्टीने प्रकरणांचे अन्वेषण होऊ लागले. मडगाव स्फोट प्रकरणातही सनातनच्या निष्पाप साधकांना गोवण्यात आले. पुढे न्यायालयाने ‘सनातनला गोवण्याच्या दृष्टीनेच प्रथमदर्शनी अहवाल नोंद केला होता’, अशा आशयाचे ताशेरे ओढत सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता केली. या सर्व प्रकरणांमध्ये निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना अटक होत असतांना खर्‍या आरोपींच्या अदृश्य चेहर्‍यांवरचे हास्य मात्र खुलत गेले किंबहुना त्यांना पुढचे गुन्हे करण्याची मोकळीक दिली गेली. हेच सध्या अनेक प्रकरणांच्या लागणार्‍या निकालांतून उघड होत आहे. एकीकडे निष्पाप हिंदूंची पुराव्यांअभावी सुटका होत आहे, तर दुसरीकडे या निष्पाप हिंदूंच्या अटकेमागे तत्कालीन सरकार आणि त्यांच्या पाळीव श्‍वानरूपी यंत्रणा यांचा हात असल्याचे पुराव्यांमागून पुरावे समोर येत आहेत. वर म्हटलेले कालचक्र ते हेच ! आता प्रश्‍न आहे तो या हिंदुद्वेष्ट्यांना शासन होणार का ? तेवढे धाडस विद्यमान सरकार दाखवणार का ? आणि कधी ?

समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणात स्वामी असीमानंद यांना अटक करण्यामागे आणखी एक दुष्ट हेतू होता. मालेगाव प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह आणि समझौता प्रकरणात स्वामी असीमानंद यांना जाणूनबुजून एका मागोेमाग एक अटक करून ‘हिंदूंचे साधू-संत गुन्हेगार आहेत’, असे चित्र हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार आणि पाळीव श्‍वानाप्रमाणे काम करणार्‍या त्यांच्या यंत्रणेला उभे करायचे होते. इमानदार श्‍वानांचे एक बरे असते, की ते खर्‍या चोरांवर भुंकून सज्जनांची म्हणजे सत्याची बाजू घेत असतात. अलीकडची सरकारी पाळीव श्‍वाने मात्र असत्याची बाजू घेण्यासाठी सज्जनांवर भुंकतात ! अर्थात् सत्य फार काळ लपून रहात नाही. पोलिसांचा खोटारडेपणा उघड करत ते साध्वीजी आणि स्वामीजी यांच्या निर्दोषत्वाच्या रूपाने बाहेर आलेच. अशाच प्रकारे दाभोलकर, पानसरे आदी प्रकरणांतही सत्य बाहेर येऊन हिंदूंचे निर्दोषत्व सिद्ध होईल आणि हिंदुद्वेषी पोलीस पुन्हा एकदा नाकावर आपटतील.

माध्यमांचा हिंदुद्वेषही कारणीभूत !

सरकारी हिंदुद्वेषाला पूरक अशी प्रसारमाध्यमांची एक मजबूत फळी कार्यरत आहे. सरकारने हिंदूंना अटक करायची आणि हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांनी त्याचा बोभाटा करायचा, हाच उपद्व्याप गेली काही वर्षे ही टोळी करत आहे. ही प्रसारमाध्यमे म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून विदेशी ख्रिस्तींच्या पैशांच्या जोरावर हिंदूंवर आणि त्यांच्या संतांवर भुंकणारे श्‍वानच आहेत. असे म्हणण्यामागे ठोस कारण आहे. हिंदूंच्या संतांच्या विरोधात गरळओक करणारी ही प्रसारमाध्यमे ख्रिस्ती अथवा इस्लामी धर्मगुरूंच्या कुकृत्यांवर भुंकण्याऐवजी ती बिळात जाऊन बसतात. केरळ येथील चर्चमधील बलात्कारी फादर मुलक्कलच्या विरोधात आजपावेतो एकही वृत्तवाहिनी अथवा वृत्तपत्र ठोस असे काही बोलायला सिद्ध नाही. पोप महाशयांनी चर्चमधील लैंगिक अत्याचारांची स्वीकृती देऊनही प्रसारमाध्यमांची भुंकणारी तोंडे बंदच आहेत. देशातील अनेक बॉम्बस्फोटांचे मूळ मदरसे असल्याचे वेळोवेळी उघड होत आहे. काश्मीरमधील मदरसे तर फुटीरतावादी देशद्रोही निर्माण करणारी केंद्रे आहेत, हे सिद्ध होऊनही प्रसारमाध्यमे शांतच ! याचा जाब हिंदू आता प्रसारमाध्यमांना निश्‍चित विचारतील आणि मग खोटारड्या माध्यमांना पळता भुई थोडी होईल.

स्वामी असीमानंद यांच्या सुटकेने हिंदूंना निश्‍चितच असीम असा आनंद झाला आहे. तथापि त्यांना विनाकारण अडकवून पाप करणारे तत्कालीन काँग्रेस सरकार, पाळीव श्‍वानाप्रमाणे काम करणार्‍या सरकारी यंत्रणा, तसेच हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे, हेच एकाअर्थी  समझौता बॉम्बस्फोटातील खरे आरोपी आहेत, असे कुणी म्हटल्यास चुकीचे काय ? कारण त्यांच्यामुळेच खरे आरोपी हाती लागू शकले नाहीत. त्यांच्यावर कारवाई होईल, तेव्हाच हिंदूंना खर्‍या अर्थाने पूर्ण न्याय मिळेल.


Multi Language |Offline reading | PDF