नगर येथे श्रीपाद छिंदम याच्यासह ४१७ जणांना एक दिवसाची शहरबंदी !

नगर – येथील महापालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत यांच्यासह अनुमाने ४१७ जणांना २३ मार्चला एक दिवसाची शहरबंदी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. प्रातांधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावावर हा आदेश देण्यात आला आहे.

१. शहरात २३ मार्चला तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या जयंतीची सिद्धता चालू केली आहे.

२. या काळात कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. तोफखाना पोलिसांनी ७० जणांवर शहरबंदीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर आदेश झाले आहेत.

३. उपमहापौर असतांना श्रीपाद छिंदम याने महापालिका कर्मचार्‍याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्याच्यावर शहरबंदी घालण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF