काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या पोलिसाने सहकार्‍यांवर केलेल्या गोळीबारात ३ पोलीस ठार 

उधमपूर (जम्मू-काश्मीर) – येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफच्या) तळावर उत्तरप्रदेशातील पोलीस शिपाई अजित कुमार याने त्याच्या सर्व्हिस रायफलमधून सहकारी पोलिसांवर वादातून केलेल्या गोळीबारात राजस्थान येथील हवालदार आर्. पोकरमाल, देहली येथील योगेंद्र शर्मा आणि हरियाणातील उमेद सिंह हे ३ पोलीस ठार झाले. गोळीबारानंतर अजित कुमार याने नंतर स्वतःवरही गोळी झाडली. यात तो गंभीररित्या घायाळ झाल्यामुळे रुग्णालयात उपचार चालू आहेत.


Multi Language |Offline reading | PDF