भुसावळ येथे धर्मांधांकडून महिला शिक्षिकेचा विनयभंग

धर्मांधांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत असतांना पोलीस आणि प्रशासन दोषींवर कठोर कारवाई करणार कि नेहमीप्रमाणे जुजबी कारवाई करण्याचा सोपस्कार पार पाडणार ?

जळगाव, २१ मार्च (वार्ता.) – भुसावळ येथील डी.एल. हिंदी विद्यालयासमोर १८ मार्च या दिवशी चार धर्मांधांनी एका महिलेची छेड काढली. तसेच काही शिक्षकांनासुद्धा मारहाण करण्यात आली. (असुरक्षित भुसावळ ! भुसावळ येथे राष्ट्रीय स्तरावरचे विमानतळ उभे करण्यापेक्षा या प्रश्‍नांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असेच सामान्य नागरिकाला वाटते ! – संपादक) या प्रकरणी चारपैकी आदिल शेख युनूस, जुनेन फिरोज कुरेशी, बबलू उपाख्य सद्दाम शेख हसन या तीन धर्मांधांना पोलिसांनी अटक केली असून अल्ताफ उपाख्य कचोरी हा आरोपी पसार आहे.

या घटनेचा विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. शालेय परिसर आणि शहरातील मुख्य चौक येथे उभे रहाणार्‍या टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी गो-सेवा परिवाराच्या सदस्यांनी प्रांताधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या घटनेमुळे शहरात महिलांसाठी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now