महिला प्राध्यापक आणि विद्यार्थिनींना मेजवानीसाठी बोलावणे इस्लामविरोधी असल्याने विद्यार्थ्याकडून प्राध्यापकाची हत्या

पाकिस्तानमधील असहिष्णुता !

अशा घटनांविषयी भारतातील पाकप्रेमी, निधर्मी, पुरो(अधो)गामी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

बहावलपूर (पाकिस्तान) –  येथे सादिक महाविद्यालयात इंग्रजी विभागाचे प्रमुख असणारे प्रा. खालिद हमीद यांनी महाविद्यालयातील नवीन विद्यार्थ्यांसाठी २१ मार्च या दिवशी स्वागत मेजवानीचे आयोजन केले होते. यासाठी त्यांनी महिला प्राध्यापक आणि विद्यार्थिनी यांनाही निमंत्रण दिल्याने महाविद्यालयातील खातीब हुसैन हा विद्यार्थी नाराज झाला. हे इस्लामविरोधी कृत्य असल्याचे सांगत त्याने प्रा. हमीद यांच्यावर चाकूने आक्रमण केले आणि यात त्यांचा मृत्यू झाला. आक्रमण करतांना ‘इस्लामविरोधी कृत्य केल्याची ही शिक्षा होती’, असे खातीब ओरडत होता. पोलिसांनी खातीब याला अटक केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF