सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील रिफेक्टरीच्या जेवणात अळ्या

विद्यापिठाच्या भोंगळ कारभाराचा नमुना !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ‘रिफेक्टरी’मधील जेवणात विद्यार्थ्यांना अळ्या आढळून आल्या. जेवणात अळ्या सापडण्याचा प्रकार वारंवार होत असल्याने विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी रिफेक्टरी चालकाला खडसावले. विद्यार्थी संघटनांनी ‘विशिष्ट भाज्या वापरू नयेत’, असे सुचवले असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या आहेत. याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यापीठ उपाध्यक्ष विकास खंडागळे यांनी विद्यापीठ प्रशासनाला विचारणा करत ‘जेवणाचा दर्जाही सुधारण्यात यावा’, अशी मागणी केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने रिफेक्टरी चालकाला तीन दिवस गोड पदार्थ देण्याचे आदेश दिले आहेत. ‘याप्रकरणी दोषींची चौकशी करण्यात येईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल’, असे विद्यापिठाने सांगितले आहे.


Multi Language |Offline reading | PDF