पाण्याच्या भौतिक शुद्धतेच्या जोडीला ते आध्यात्मिकदृष्ट्याही शुद्ध असणे आवश्यक !

२२ मार्च या दिवशी असलेल्या जागतिक जलदिनाच्या निमित्ताने…

‘वर्ष २०३० पर्यंत सर्वांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे’, हे  ‘संयुक्त राष्ट्रां’चे ध्येय आहे. या अनुषंगाने २२ मार्च २०१९ या ‘जागतिक जलदिना’चे ब्रीदवाक्य आहे – ‘तुम्ही कोणीही असा, कोठेही असा – ‘पिण्याच्या पाण्याची उपलब्धता’ हा तुमचा मूलभूत मानवाधिकार आहे.’ प्रत्यक्षात जगातील जलाशयांपैकी केवळ २.५ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. त्यातही बहुतांश पिण्यायोग्य पाणी हिमनग, पर्वतांवरील बर्फ आणि भूमीखाली असलेले आहे. त्यामुळे एकूण पिण्यायोग्य पाण्याच्या केवळ ०.०१ टक्का पाणी सरोवर आणि नद्या यांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. या ०.०१ टक्के पाण्यावर ७४० कोटी मानव, वनस्पती आणि प्राणी अवलंबून आहेत. यावरून पिण्याचे पाणी हा पृथ्वीवरील किती दुर्मिळ आणि अमूल्य घटक आहे, हे आपल्या लक्षात येते. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि शुद्धता यांच्या संदर्भात जगभर पुष्कळ अभ्यास झाला आहे अन् चालू आहे; मात्र हा अभ्यास पाण्याची स्थूल भौतिक शुद्धता आणि वितरण यांवरच केंद्रित झालेला आढळतो. केवळ या निकषांवर केलेला मर्यादित अभ्यास मानवाच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टीने उपयुक्त आहे का ?

१. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने जगभरातील जलस्रोतांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा केलेला अभ्यास

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आधुनिक वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म परीक्षण (टीप) यांच्या आधारे जगभरातील जलस्रोतांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात आला. या आध्यात्मिक संशोधनाचा आरंभ फेब्रुवारी २०१८ मध्ये झाला. संशोधनासाठी जगभरातील अधिकाधिक जलस्रोतांमधून नमुने मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. फेब्रुवारी २०१८ ते २० मार्च २०१९ या कालावधीत २६ देशांतील एकूण २६१ पाण्याचे नमुने मिळाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले

२. अभ्यासाचा सारांश : पाणी भौतिकदृष्ट्या शुद्ध असण्याबरोबर ते आध्यात्मिकदृष्ट्याही शुद्ध असणे आवश्यक !

जगभरातील २६ देशांतील पाण्याच्या २१६ नमुन्यांपैकी बहुतांश नमुन्यांमध्ये नकारात्मकता आढळली, हे चिंताजनक आहे. असे हे आध्यात्मिकदृष्ट्या अशुद्ध पाणी प्राशन केल्याने किंवा त्याने अंघोळ केल्याने मनुष्यावर आध्यात्मिकदृष्ट्या अनिष्ट परिणाम होतात. हे परिणाम शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील विविध व्याधींच्या रूपात दिसून येतात. त्यामुळे ‘सर्वांसाठी शुद्ध पाण्याची उपलब्धता’, यासाठीच्या व्यापक प्रयत्नांत पाण्याच्या आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धतेसाठीही प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

सद्यःस्थितीत समाजात अधर्म माजला आहे; कारण समाजात साधना करणार्‍यांचे प्रमाण अत्यल्प आहे. परिणामस्वरूप व्यक्तींमधील रज-तमाचा परिणाम वातावरण, तसेच पाणी यांवर झाला आहे. धर्माचरण आणि नियमित साधना केल्याने माणसातील रज-तम न्यून होत जाते आणि त्याच्यामध्ये सात्त्विकता निर्माण होते. या सात्त्विकतेचा सुपरिणाम वातावरण, पाणी, भूमी इत्यादींवर होतो. त्यामुळे सर्वांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी समाजात साधनेचा व्यापक प्रसार होणे आवश्यक आहे !’

श्री. शॉन क्लार्क

या अभ्यासातील पुढील सूत्रे रविवार, २४.३.२०१९ या दिवशी प्रसिद्ध करत आहोत.

अ. पाण्याच्या नमुन्यांमध्ये आध्यात्मिक स्तरावर आढळलेली सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने

आ. पाण्याच्या नमुन्यांमधील सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदनांचे देशपरत्वे विश्‍लेषण

इ. नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीनुसार (उतरत्या क्रमाने) क्रमवारीत असलेले पाण्याचे १० नमुने

ई. सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीनुसार (उतरत्या क्रमाने) क्रमवारीत असलेले पाण्याचे १० नमुने)

लेखक : परात्पर गुरु डॉ. आठवले, संस्थापक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय
सहलेखक : श्री. शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF