न्यूझीलंडमध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर दुखवटा पाळण्यासाठी मुंबईच्या आक्रमणावरील चित्रपट चित्रपटगृहातून काढला

ऑकलंड (न्यूझीलंड) – मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणावर काढण्यात आलेलला ‘मुंबई हॉटेल’ हा चित्रपट न्यूझीलंडच्या चित्रपटगृहातून काढण्यात आला आहे. ख्राइस्टचर्च येथे २ मशिदींवरील गोळीबाराच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गोळीबारात ठार झालेल्यांसाठी दुखवटा पाळण्यासाठी हा चित्रपट पुढचे काही दिवस दाखवला जाणार नाही. न्यूझीलंडच्या चित्रपट वितरकांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. गेल्याच आठवड्यात हा चित्रपट न्यूझीलंडमध्ये प्रदर्शित झाला होता.


Multi Language |Offline reading | PDF