मुसलमानांनी ‘रामजन्मभूमी’ चित्रपट पाहू नये ! –  ऑल इंडिया उलेमा बोर्डाचा फतवा

  • निधर्मी भारतातील मुसलमान संघटनांचा सर्वधर्मसमभाव !
  • ‘बाबरी मशीद’ नावाचा चित्रपट काढला असता, तर या संघटनेने  मुसलमानांनी तो पहावा म्हणून फतवा काढला असता !

चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी

भोपाळ – ‘ऑल इंडिया उलेमा बोर्ड’ या मध्यप्रदेशातील उलेमांच्या संस्थेने  मुसलमानांनी ‘रामजन्मभूमी’ चित्रपट न पहाण्याचा फतवा काढला आहे. तसेच केंद्र आणि मध्यप्रदेश सरकारांनी या चित्रपटावर बंदी घालावी किंवा लोकसभा निवडणूक होईपर्यंत याचे प्रदर्शन रोकावे, अशी मागणी केली आहे. ‘हा चित्रपट दोन्ही धर्मांमध्ये घृणा निर्माण करणारा आहे. अयोध्येच्या प्रकरणात मध्यस्थांच्या माध्यमातून वाद सोडवण्याचा प्रयत्न होत असतांना हा चित्रपट प्रदर्शित करून वातावरण बिघडवले जाऊ शकते’, असेही या संस्थेने म्हटले आहे. या चित्रपटाची कथा उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी लिहिली आहे. यात रामजन्मभूमीच्या  आंदोलनाची संबंधित घटनांना दाखवण्यात आले आहे. २९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now