नीरव मोदी यांना लंडनमध्ये अटक

लंडन – पंजाब नॅशनल बँकेचे १३ सहस्र कोटी रुपये बुडवून भारतातून पळून गेलेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात २ दिवसांपूर्वीच वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. त्यांना भारतात प्रत्यार्पण करण्याविषयीची सुनावणी आता न्यायालयात केली जाणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF