गोध्रा हत्याकांडाच्या प्रकरणी याकूब पटालिया याला जन्मठेप

१७ वर्षांनंतर या प्रकरणातील काही आरोपींना शिक्षा मिळत असेल, तर अशामुळे गुन्हे करणार्‍यांवर वचक कधीतरी बसेल का ?

कर्णावती (गुजरात) – २७ फेब्रुवारी २००२ या दिवशी गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसमधील एका डब्याला आग लावून त्यातील ५९ कारसेवकांना जाळून ठार मारल्याच्या प्रकरणी येथील विशेष न्यायालयाने याकूब पटालिया या आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या प्रकरणात अन्य ३ जणांना दोषमुक्त केले आहे. डब्याला आग लावणार्‍या धर्मांधांच्या जमावात याकूबदेखील सहभागी होता.

यापूर्वी ऑगस्ट २०१८ मध्येही विशेष न्यायालयाने या प्रकरणी २ जणांना दोषी ठरवले होते, तर ३ जणांना दोषमुक्त केले होते. दोषी ठरलेल्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गुजरात उच्च न्यायालयाने यापूर्वी वर्ष २०१७ मध्ये ११ जणांच्या मृत्यूदंडाची शिक्षा न्यून करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच अन्य २० जणांची जन्मठेप कायम ठेवतांना ६३ जणांची सुटका करण्याचा निर्णयही कायम ठेवला होता.


Multi Language |Offline reading | PDF