स्वामी असीमानंद यांच्यासहित ४ आरोपी निर्दोष

वर्ष २००७ ला समझौता एक्सप्रेसमध्ये झालेल्या स्फोटाचे प्रकरण

  • हिंदु आतंकवादाचा ढोल बडवणारे पुरो(अधो)गामी, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आणि तथाकथित निधर्मीवादी आता कुठल्या बिळात लपले आहेत ?
  • १२ वषार्र्ंनंतर एका महत्त्वाच्या खटल्याचा निकाल लागतो, असे जगभरात कुठे होत नसेल, हे भारताला अत्यंत लज्जास्पद !
  • अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांवरील आरोपांमुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्यांची आणि हिंदु धर्मियांची अपकीर्ती झाली. 
  • अशा वेळी खोट्या पुराव्यांच्या आधारे अटक करणार्‍या संबंधितांवर कारवाई करून त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल करा ! याला उत्तरदायी असणार्‍यांना बडतर्फ करून कारागृहात डांबा !

पंचकुला (हरियाणा) – येथील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने १८ फेब्रुवारी २००७ मध्ये समझौता एक्सप्रेसमध्ये झालेल्या स्फोटाच्या प्रकरणी स्वामी असीमानंद यांच्यासह लोकेश शर्मा, कमाल चौहान आणि राजिंदर चौधरी या आरोपींची २० मार्च या दिवशी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात एकूण ८ आरोपी होते. त्यांतील सुनील जोशी या एका आरोपीचा मृत्यू झाला आहे, तर संदीप डांगे, रामचंद्र कालासांग्रा आणि एक असे ३ फरार आहेत. असीमानंद यांना १९ नोव्हेंबर २०१० मध्ये अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले होते. या स्फोटामध्ये ६८ जणांचा मृत्यू झाला होता, तर १२ जण घायाळ झाले होते. ठार झालेल्यांमध्ये बहुसंख्येने पाकिस्तानी नागरिक होते.

१. निकाल देतांना न्यायालयाने पाकच्या महिला नागरिक राहिला वकील यांची याचिका फेटाळून लावली. १४ मार्च या दिवशी यावर निकाल देण्यात येणार होता; मात्र राहिला वकील यांनी या प्रकरणात इमेलद्वारे याचिका प्रविष्ट केली. त्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. राहिला वकील यांनी त्यांचे अधिवक्ता मोमीन मलिक यांच्या माध्यमातून सांगितले होते की, त्या या प्रकरणात साक्ष देऊ इच्छित आहेत. या स्फोटात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.

२. समझौता एक्सप्रेस देहलीहून लाहोर येथे जात असतांना हरियाणाच्या पानीपत जिल्ह्यातील सिहाव गावातील दिवाना स्थानकाच्या जवळ स्फोट झाला होता. यातील आरोपींवर या विशेष न्यायालयामध्ये खटला चालवण्यात येत होता. या खटल्यात ३०२ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF