प्रमाणपत्र घोटाळ्यातील दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन ! – अभाविप

कोल्हापूर, २० मार्च (वार्ता.) – शिवाजी विद्यापिठातील ५४ व्या दीक्षांत समारंभातील पदवी प्रमाणपत्रातील स्वाक्षरी गोंधळ आणि दुबार मुद्रणाच्या संदर्भातील आर्थिक हानीविषयी प्रशासनास खडसावले होते. त्या वेळी कुलगुरूंनी २२ मार्च या दिवशी होणार्‍या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. या दिवशी कारवाई न झाल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ठिय्या आंदोलन आणि घेराव घालण्यात येईल, अशी चेतावणी परिषदेच्या प्रांत सहमंत्री साधना वैराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रशासनाने व्यवस्थापन परिषदेच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. समितीने हा अहवाल दिला, तरीही अद्याप या घोटाळ्यातील दोषींवर कारवाई झाली नाही. या संदर्भात अभाविपने वारंवार पाठपुरावा, पत्रव्यवहार केला, तरीही विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणात दिरंगाई केली. तरी दुबार मुद्रणाचा व्यय दोषींकडून घेण्यात यावा, अशी मागणीही या पत्रकार परिषदेत करण्यात आली. या वेळी प्रवीण जाधव यांसह अन्य उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF