मानव संसाधन विकास विभागाकडील अहवालातून उघड झालेली राज्यातील शिक्षणाची दु:स्थिती !

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण हे चौथ्या श्रेणीचे !

मुंबई – मानव संसाधन विकास विभागाकडून राज्याच्या शिक्षण विभागाचा कामगिरी निर्देशांक सारांशरूपात घोषित करण्यात आला आहे. या निर्देशांकानुसार महाराष्ट्रातील शालेय शिक्षण हे चौथ्या श्रेणीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विभागाला १ सहस्र गुणांपैकी सरासरी ६५१ ते ७०० च्या दरम्यान गुण प्राप्त आहेत.

पहिल्या श्रेणीत केरळ, गुजरात आणि चंदिगड या राज्यांनी स्थान मिळवले असून दुसर्‍या श्रेणीत दादरा नगर हवेली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू या राज्यांनी स्थान मिळवले आहे. तिसर्‍या श्रेणीत देशातील १० राज्यांनी स्थान मिळवले आहे, तर चौथ्या श्रेणीत महाराष्ट्रासह ६ राज्यांचा समावेश आहे. निर्देशांकाच्या ७ निकषांपैकी शिक्षण विभाग दर्जाच्या संदर्भात महाराष्ट्राला १८० पैकी १४४ गुण मिळाले असून ते ११ व्या स्थानावर आहे, तर प्रवेशामध्ये राज्याला ८० पैकी ७६ गुण प्राप्त आहेत. पायाभूत आणि आवश्यक सुविधांमध्ये ११३ गुण मिळवीत राज्य ९ व्या स्थानावर आहे. प्रशासकीय प्रक्रिया राबवण्यात ३५० पैकी केवळ १५५ गुण मिळाले असून ते २९ व्या स्थानावर आहे.

शिक्षण विभागाचा सरासरी अधिवास, समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यामध्ये महाराष्ट्राची मागील ३ वर्षांची कामगिरी उत्तम असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले की, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या नावाखाली जो शिक्षणाचा दर्जा देण्याचे सांगितले जात आहे त्याला छेद देणारा हा अहवाल आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षणाची श्‍वेतपत्रिका या निमित्ताने काढण्याची आवश्यकता असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. पायाभूत सुविधा, राज्य शासनाकडून राबवल्या जाणार्‍या योजना या सार्‍यावर पुन्हा एकदा काम करण्याची आवश्यकता आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now