नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस

पुणे – मंगेशकर फाऊंडेशनने काही वर्षांपूर्वी सरकारकडून ९९ एकर भूमी केवळ १ रुपये किंमत मोजून लीजवर घेतली होती. त्या भूमीवर उभ्या रहाणार्‍या रुग्णालयामध्ये न्यूनतम दरात वैद्यकीय सुविधा देण्याचा करार करण्यात आला होता. त्याचे उल्लंघन केल्याची तक्रार रमेश धर्मावत यांनी केली असून या प्रकरणी आयुक्तांनी लता मंगेशकर फाऊंडेशन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्या पदाधिकार्‍यांना नोटीस बजावली आहे. त्या करारानुसार २० रुपयांमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, असे वचन दिले होते; मात्र ६०० रुपये आकारले जात आहेत. दीनानाथ रुग्णालयाने हे आरोप फेटाळले असून नोटीशीचे समाधानकारक उत्तर देण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले आहे.


Multi Language |Offline reading | PDF