परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या भेटीच्या वेळी सौ. भाग्यश्री जोशी यांना आलेली अनुभूती

१. परात्पर गुरु पांडे महाराज यांना भेटल्यावर पूर्वीप्रमाणे भावजागृती न होता केवळ शांत वाटणे, परात्पर गुरु पांडे महाराज देवदेवतांच्या समोर परात्पर गुरुदेवांचे गुणगाण करत असल्याचे जाणवणे

सौ. भाग्यश्री जोशी

‘एकदा आम्हा जोशी कुटुंबियांची देवद आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याशी भेट झाली. त्याच्या आधीच्या वर्षी परात्पर गुरु पांडे महाराज यांना भेटल्यावर माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला भावाश्रू आवरत नव्हते. भेटीच्या वेळी मी पूर्ण वेळ भावस्थितीत होते. त्या वेळी माझ्या मनात ‘परात्पर गुरु पांडे महाराजांमुळेच आपण जिवंत आहोत’, असा भाव होता. या वेळी ‘परात्पर गुरु महाराजांच्या कृपेमुळेच आपण जिवंत आहोत आणि श्‍वास घेत आहोत. तेच मला हालचाल करण्यास आणि सेवा करण्यास शक्ती देत आहेत’, असे पूर्वीप्रमाणेच वाटत होते; पण त्या व्यतिरिक्त मला या वेळेस फार शांतही वाटत होते. ‘परात्पर गुरु महाराजांकडे सतत पहात रहावे. त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे मला वाटत होते. त्या वेळी ‘मी वेगळ्याच लोकात आहे. तेथे सर्व देवदेवता आहेत आणि परात्पर गुरु पांडे महाराज त्यांच्या समोर असलेल्या परात्पर गुरुदेवांचे गुणगान करत आहेत’, असे मला जाणवत होते. माझे ध्यान लागत होते.

२. ‘भावजागृती का होत नाही ?’, असा विचार मनात येणे आणि परात्पर गुरु पांडे महाराजांमधील निर्गुण तत्त्व वाढल्यामुळे ही निर्गुणाची अनुभूती आल्याचे सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांनी सांगणे

त्या वेळी मधूनच ‘आज आपली भावजागृती का होत नाही ?’ असा विचार माझ्या मनात येत होता; म्हणून मी सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांना याविषयी विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांचे निर्गुण चैतन्य वाढल्यामुळे तुला निर्गुणाची अनुभूती आली. हा अव्यक्त भाव आहे. मग तू व्यक्त भावात का अडकतेस ? त्यांच्याकडून मिळणार्‍या चैतन्याने तुझ्यातील वाईट शक्तीचा नाश होत आहे; म्हणून तुला अशी अनुभूती आली.’

– सौ भाग्यश्री जोशी, (पू. जयराम जोशी यांची सून), सनातन आश्रम, मिरज.

सौ. भाग्यश्री जोशी : परात्पर गुरुदेव, मला मिळालेले उत्तर योग्य आहे कि माझी साधनेत घसरण होत आहे; म्हणून माझी भावजागृती झाली नाही ?

डॉ. आठवले : योग्य आहे.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF