पुण्यात वेश्याव्यवसाय करणार्‍या २ बांगलादेशी तरुणींकडे भारतीय आधारकार्ड सापडले

अवैधरित्या ओळखपत्रे बनवून देणार्‍यांनाही कठोर शासन होणे आवश्यक !

पुणे – स्वारगेट परिसरात वेश्याव्यवसाय करणार्‍या दोन बांगलादेशी तरुणींकडे भारतीय आधारकार्ड आणि पॅनकार्ड सापडले असून त्यांनी ते कार्ड नागपूर आणि मुंबई परिसरातून बनवून घेतल्याचे समोर आले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने सापळा रचून वेश्या व्यवसायाचा मागील आठवड्यात पर्दाफाश केला. खोटे ओळखपत्र बनवून देणारे अतिकखान साहेबखान आणि ककीबुल शेख यांना अटक करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF