मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे वृंदावन, वाराणसी आणि उत्तराखंड येथील सुलभ इंटरनॅशनल फाऊंडेशनकडून आयोजित होळीचा कार्यक्रम रहित

डॉ. बिंदेश्‍वर पाठक

मथुरा – वृंदावनच्या ठाकुर गोपीनाथ मंदिरात सुलभा इंटरनॅशनल फाऊंडेशन यांच्याकडून होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिवर्षीप्रमाणे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी देश आणि विदेशातील २५० ते ३०० पत्रकार आणि छायाचित्रकार आले होते; मात्र गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्तामुळे हा कार्यक्रम रहित करण्यात आला, अशी माहिती या फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. बिंदेश्‍वर पाठक यांनी दिली.

सुलभ फाऊंडेशन वर्ष २०१२ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार  वृंदावन, वाराणसी आणि उत्तराखंड येथे भजन-कीर्तन आणि भिक्षावृत्तीद्वारे रहाणार्‍या विधवा आणि परितक्त्या महिलांना सन्मानाने जगण्यास साहाय्य करत आहे. तसेच यांच्यासाठी होळी, दिवाळी, रक्षाबंधन, दुर्गापूजा आदी सण साजरे केले जातात. या अनुषंगानेच वरील सर्व ठिकाणी होळी साजरी करण्यात येणार होती. यात अनुमाने १ सहस्र विधवा महिला सहभागी होणार होत्या.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now