होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे निवेदन !

रायबाग येथे उपतहसीलदार श्री. मंगसुळी यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

बेळगाव, २० मार्च (वार्ता.) – होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखणे, तसेच ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ निर्मित ‘सर्फ एक्सेल’च्या विज्ञापनामधून हिंदूंच्या भावना दुखावणारे विज्ञापन रोखले जावे यासाठी कर्नाटक राज्यात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने गोकाक, बेळगाव, रायबाग येथे निवेदन देण्यात आले.

गोकाक येथे तहसीलदार श्री. कुलकर्णी यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

१. गोकाक येथे तहसीलदार श्री. कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश कांबी, जयभारत युवासेनेचे उत्तर कर्नाटक अध्यक्ष श्री. शिवानंद हिरेमठ, धर्मप्रेमी श्री. रमेश बिरडी, श्री. साईनाथ कोसंदळ, श्री. मानतेश पाटील, सौ. कल्याणी सातपुते, सर्वश्री प्रमोद पडतारी, सागर शिलवंत, श्रीधर हुली उपस्थित होते.

२. बेळगाव येथे तहसीलदार श्री. एस्. जानकी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. जानकी यांनी निवेदनाची योग्य नोंद घेऊ, असे सांगितले.

३. रायबाग येथे उपतहसीलदार श्री. परमानंद मंगसुळी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. जयदीप देसाई, डॉ. सदानंद नाईक आणि धर्मशिक्षण वर्गामधील धर्मप्रेमी आणि स्वामी विवेकानंद अनाथ आश्रमाचे श्री. सुभाष नाईक उपस्थित होते.

कागल येथे तहसीलदार गणेश गोरे यांना निवेदन !

कागल (जिल्हा कोल्हापूर) – कागल येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तहसीलदार श्री. गणेश गोरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. किरण चव्हाण आणि श्री. दशरथ डोंगळे यांसह अन्य उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF