(म्हणे) ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास !’ – शरद पवार 

सरड्याप्रमाणे भूमिका पालटणारे राजकारणी लोकशाही निरर्थक ठरवतात !

पुणे – पुलवामा प्रकरणानंतर झालेल्या बैठकीत आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचा सल्ला मीच दिला होता, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी भोसे येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले होते. यावर शरद पवारांनी घुमजाव करत प्रसिद्धीमाध्यमांनी या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने देहली येथे बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सैन्यदलाच्या पाठीशी रहाण्याचा ठराव एकमताने संमत झाला होता. त्यास माझी संमती होती, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी फेसबूक पोस्टद्वारे दिले आहे.


Multi Language |Offline reading | PDF