भावसत्संगाला उपस्थित राहिल्यानंतर एका प्रचंड ओझ्यातून मुक्त झाल्याप्रमाणे वाटून पुष्कळ हलके वाटणे

श्री. अद्रियन डूर्

‘२८.१.२०१७ या दिवशी विदेेशातील साधकांसाठी आयोजित केलेल्या पहिल्याच भावसत्संगाला उपस्थित रहाण्याची मला संधी मिळाली. सत्संगाच्या आरंभापासूनच माझी भावजागृती होत होती आणि नामजप गुणात्मक अन् चांगला होत होता. सत्संग संपल्यावरही मला त्याचा परिणाम जाणवत होता. एका प्रचंड ओझ्यातून मुक्त झाल्याप्रमाणे वाटून मला पुष्कळ हलके वाटत होते. माझ्या कृतज्ञतेतही पुष्कळ वाढ झाली होती. ‘साधकांची भाववृद्धी होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या सत्संगाचा लाभ करून देऊन साधकांवर मोठी कृपाच केली आहे’, याची मला जाणीव झाली. ‘हा सुंदर सत्संग आणि आनंददायी अनुभूती दिल्याविषयी श्रीकृष्ण अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती माझा कृतज्ञताभाव सतत वाढत राहो’, ही मनःपूर्वक प्रार्थना !’

– श्री. अद्रियन डूर्, ऑस्ट्रिया (२८.१.२०१७)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now