आध्यात्मिक उपायांसाठी दैनिक सनातन प्रभात, मोरपीस, खोकी आदींचा वापर करतांना लक्षात घ्यावयाची सूत्रे

साधकांना सूचना

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘साधक स्वतःवरील आवरण काढण्यासाठी दैनिक सनातन प्रभातचा अंक, न पेटवलेली उदबत्ती, मोरपीस, खोकी आदी वस्तूंचा वापर करतात.

१. दैनिक सनातन प्रभात, उदबत्ती, मोरपीस आदी वस्तू साधकावरील आवरण ढकलण्याचे कार्य करतात. त्या अन्य साधकांनी वापरलेल्या असल्या, तरी त्यांचा वापर करता येईल. त्यांची शुद्धी करण्याची आवश्यकता नाही.

२. साधकावरील आवरण उपायांच्या खोक्यांमध्ये खेचले जात असल्याने त्यांची प्रतिदिन उदबत्तीने शुद्धी करणे आवश्यक आहे. इतरांनी वापरलेली खोकी साधकांनी उदबत्तीने शुद्धी करून किंवा काही वेळासाठी उन्हात ठेवून वापरावीत.

३. आवरण काढण्यासाठी वापरात असलेला दैनिकाचा अंक खराब झाल्यास वा त्यावर डाग पडल्यास साधकांनी त्याऐवजी दुसरा अंक वापरावा.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF