शोधनिबंध लिहिण्याविषयी मनात नकारात्मक विचार आल्यावर श्रीकृष्णाला आर्ततेने प्रार्थना करणे आणि प्रार्थनेमुळे मनात सकारात्मक विचार येऊन भावजागृती होणे

श्री. अद्रियन डूर्

१. एक शोधनिबंध लिहिण्याविषयी मनात नकारात्मक विचार येणे आणि त्या विचारांतून बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णाला कळकळीने प्रार्थना करणे

‘एकदा घरी मी नामजप करत असतांना एक शोधनिबंध लिहिण्याच्या माझ्या क्षमतेविषयी माझ्या मनात नकारात्मक विचार आणि भावना उफाळून येत होत्या. ‘हा शोधनिबंध लिहिणे, ही माझ्यासाठी अतिशय अवघड गोष्ट आहे’, असे मला वाटत होते. ‘यामधे माझा वेळ वाया जाईल’ किंवा ‘माझ्याकडून चुका होतील’, अशी भीतीही मला वाटत होती. याच विचारांत अडकल्यामुळे नामजपावरही माझे लक्ष केंद्रित होत नव्हते. ‘मी या नकारात्मक विचारांमध्ये अडकलो आहे’, हेे लक्षात आल्यावर त्यातून बाहेर काढण्यासाठी मी श्रीकृष्णाला कळकळीने प्रार्थना केली.

२. श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर चिंतन होऊन लगेचच काही उपाय सुचणे आणि ते सुचल्यावर भावजागृती होणे

प्रार्थना केल्यावर ‘मला नेमकी कोणती गोष्ट खटकतेे आणि त्यावर कोणती उपाययोजना करायची’, याविषयीचे विचार माझ्या मनात येऊ लागले. त्या वेळी ‘स्वतःकडून चुका होण्याची आणि प्रामुख्याने वेळ वाया जाण्याची भीती मला वाटते. त्याचप्रमाणे माझ्यात स्वीकारण्याची वृत्ती नसून अभ्यास करतांना माझ्याकडून प्रार्थना आणि नामजपही होत नाही’, या गोष्टींची मला जाणीव झाली. त्या क्षणापासून ‘सेवा परिपूर्ण होण्यासाठी कळकळीने प्रार्थना करणे, सेवेत परिपूर्णता येण्यासाठी मधेमधे प्रार्थना आणि नामजप करणे, कार्यक्षमतेच्या संदर्भात लक्षात आलेल्या चुकांचे विश्‍लेषण करून त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच कार्यपूर्तीसाठी लागणारा अवधी मनापासून स्वीकारणे’, असे काही उपाय मला आतूनच सुचले. हे विचार मनात आल्यावर माझी भावजागृती झाली.

माझ्या आध्यात्मिक प्रगतीच्या आड येणार्‍या प्रत्येक अडथळ्यावर मात करता यावी, यासाठी मला उपाय सुचवल्याविषयी मी ईश्‍वरचरणी कृतज्ञ आहे.’

– श्री. अद्रियन डूर्, ऑस्ट्रिया (२१.१.२०१७)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now